टोकियोमध्ये एका कंपनीनं कर्मचाऱ्यांचं हित लक्षात घेत 4 दिवसांचा कार्यालयीन आठवडा जाहीर केला. बरं, असं पहिल्यांदाच होत नसून, काही असेही देश आहेत जिथं आठवड्याला फक्त 25 तासच काम करून घेतलं जातं.
सर्वात कमी कार्यालयीन तासांच्या यादीत आघाडीवर असणारा देश आहे येमेन. इथं कर्मचारी दर आठवड्याला फक्त 25.4 तास काम करतात.
यामागोमाग अनुक्रमे नेदरलँड्स (26.7 तास), नॉर्वे (27.1 तास), वनुआतू (27.6 तास) या देशांची नावं येतात.
फिनलँडमध्ये आठवड्याला 28.9 तास काम करणं अपेक्षित असतं. तर, स्वीडनमध्ये 29.2 तासांचा कार्यालयीन आठवडा असतो.
मोझाम्बिक आणि ऑस्ट्रीयामध्ये कार्यालयीन आठवडा 29.4 तासांचा असतो. तर, डेन्मार्कमध्ये कामाचे दर आठवड्याचे एकूण तास असतात 29.5.
थोडक्यात नोकरीच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांचं हित आणि त्यांच्या मानसिक आरोग्यासह शारीरिक सुदृढता प्राधान्यस्थानी ठेवत कामाच्या ठिकाणी आरोग्यदायी वातावरणनिर्मितीसाठी काही देश सातत्यानं प्रयत्नशील असल्याचं पाहायला मिळत आहे. (सर्व छायाचित्रं सौजन्य- फ्रीपिक)