कोणत्याही लग्न कार्यात अनेक विधी केले जातात. प्रत्येकाचे वेगळे महत्त्व असते.
अशीच एक विधी म्हणजे वधू-वराच्या डोक्यावर अक्षता टाकणे. असे का केले जाते याबद्दल जाणून घेऊयात.
तांदूळ घेऊन त्याला वेगवेगळे रंग लावून अक्षता तयार केल्या जातात. मंगलाष्टक झाल्यावर त्या वधू-वरांच्या डोक्यावर टाकल्या जातात.
तांदूळ हे धान्य एकदल धान्य आहे. याचे दोन भाग होत नाहीत किंवा ते दुभंगत नाही. आयुष्याचा संसार सुद्धा दुभंगू नये ही त्यामागे भावना असते.
तांदूळ पेरल्यावर जे रोप येते ते काढून पुन्हा दुसरीकडे लावावे लागते, तेव्हा ते खरे बहरते. त्याचप्रमाणे मुलगी लग्नाअगोदर माहेरी वाढते एकीकडे, आणि नंतर ती सासरी जाते.
या कारणांमुळे अक्षता मांगल्यरूपी मानली जाते. असेच मुलीने बहरावे म्हणून अक्षता वापरल्या जातात.
याशिवाय तांदळाला सुखाचं आणि सौभाग्य प्रतिक मानलं जातं आणि त्यामुळे नवरा-बायकोवर अक्षता म्हणून तांदूळ टाकले जातात.