2023 मध्ये मात्र त्यांच्या कमाईत मात्र घट झाली आहे. दरम्यान टीम कूक यांची दिवसाची कमाई 1 कोटींच्या आसपास आहे.
टीम कूक यांनी 2022 मध्ये 99.4 मिलियन डॉलर म्हणजेच 815 कोटींची कमाई केली होती. यामधील 3 मिलियन डॉलर हा त्यांचा फक्त पगार होता.
टीम कूक यांच्याकडे Apple चे जवळपास 30 लाखांहून अधिक शेअर्स आहेत. पण हे कंपनीच्या 1 टक्क्यांपेक्षाही कमी आहे.
फोर्ब्सनुसार, टीम कूक यांचं नेटवर्थ 1.9 अरब डॉलर, म्हणजेच 15 हजार कोटींच्या आसपास आहे.
स्टोअर ओपनिंगसाठी भारतात आलेले Apple चे बॉस टीम कूक सध्या 62 वर्षांचे आहेत.
याआधी त्यांनी मुंबईत मुकेश अंबानी, एन चंद्रशेखरन, बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दिक्षित यांच्यासह अनेकांची भेट घेतली.
Apple चे CEO टीम कूक यांच्याच हस्ते या स्टोअरचंही उद्घाटन करण्यात आलं. दिल्लीत उद्घाटनासाठी दाखल झालेल्या टीम कूक यांनी यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट
Apple ने मुंबईतील बीकेसीमध्ये भारतातील पहिल्या स्टोअरचं लाँचिंग केल्यानेतर आता दिल्लीमधील साकेत येथेही अधिकृत स्टोअरचं उद्घाटन केलं आहे.