अहो आश्चर्यम्...

जपानमधील बेटांचा अंतिम आकडासुद्धा लवकरच जाहीर केला जाणार आहे, तूर्तास या देशातील ही आश्चर्य पाहण्यासाठी अनेकांनीच उत्सुकता व्यक्त केली आहे.

14 हजार बेटं

जियोस्पेशियल इंफॉरमेशन अथॉरिटी (GSI) च्या माध्यमातून जपानमध्ये 14 हजारांहून अधिक बेटं असल्याची बाब जगासमोर आली आणि अनेकांना आश्चर्य वाटलं.

बेटांची मोजणी

2021 नंतर जपाननं बेटांच्या मोजणीची नव्यानं सुरुवात केली. कोणत्याही देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीनं बेटांचं स्थान महत्त्वाचं असतं.

बेट हरवलं...

2013 मध्ये जपानी तटरक्षक दलानं एक बेट शोधत त्याला इसानबे हानाकिता कोजिमा असं नाव दिलं होतं. पण, कालांतरानं हे 4.6 फुटांचं बेट समुद्राच्या पाण्यात सामावून गेलं.

सक्रिय ज्वालामुखी

जपानी बेटांचा समूह पॅसिफिक महासागरातील रिंग ऑफ फायरचाच एक भाग आहे. इथं अनेकदा ज्वालामुखी सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतं.

बेट म्हणजे काय?

संयुक्त राष्ट्र कन्वेंशनच्या व्याख्येनुसार ज्या भूखंडाच्या चारही बाजूंना समुद्राचं पाणी असून भरतीच्या वेळी भूभाग समुद्राच्या पाण्यापासून वर असेल, ते बेट असतं.

बेटांची ओळख

बऱ्याचदा बेटांच्या लहानमोठ्या आकारामुळं ते मोजणीतून निसटतात, अनेकदा त्यांची क्षेत्रफळं लक्षात येत नाहीत, तर अनेकदा ओळख पटत नाही

7 हजार नवी बेटं

जपानमधील 7000 बेटांमध्ये आणखी 7000 बेटं नव्यानं जोडली जाणार आहेत. ज्यामुळं या एकट्या देशातील बेटांची संख्या 14 हजारांच्याही पलीकडे पोहोचेल. (सर्व छायाचित्रे- गेटी)

VIEW ALL

Read Next Story