पावसाळा सुरु झाला की पर्यटकांची पावले रायगडाकडे वळतात.
पावसाळ्यात येथील वातावरण खूपच सुंदर आणि मनमोहक असते.
दरम्यान रायगडला जाणाऱ्या पर्यटकांसाठी मोठी अपडेट समोर आलीय.
रविवारी संध्याकाळी रायगडावर ढगफुटी सदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती. येथे काही पर्यटक अडकल्याचे व्हिडीओ समोर आले होते.
रायगडावर गेलेल्या पर्यटकांना दुपारपर्यंत सुरक्षित खाली उतरवण्यात येईल.
यानंतर रायगड रोप वे पुढील आदेशापर्यंत बंद रहाणार असल्याचे ते म्हणाले.
रायगडचा पायरी मार्ग आजपासून 31 जुलै पर्यंत बंद ठेवण्यासंबधी रायगड जिल्हाधिकारी यांना प्रस्ताव सादर केला आहे.
यानंतर महाड प्रांताधिकारी डॉ. ज्ञानोबा बाणापुरे यांनी महत्वाचा निर्णय घेतलाय.