कोण ठरवतं घड्याळावर दिसणारी वेळ? चालवा डोकं...
पृथ्वीचा वर्तुळ पाहिलाय का कधी? अभ्यासादरम्यान पाहिलेल्या या पृथ्वीच्या गोळ्यावर उभ्या आणि आडव्या रेषा असतात.
आडव्या रेषा अक्षांश रेषा असतात, तर उभ्या देशांतर रेखा असतात. अक्षांश रेषा पृथ्वीच्या पश्चिम पूर्वेपासून सुरू झालेल्या असतात.
देशांतर रेषा मात्र उत्तरेहून दक्षिणेपर्यंत आलेल्या असतात. याच उभ्या रेषांवरून घड्याळातील वेळ निर्धारित होते.
याच उभ्या रेषांमध्ये एक रेष 'ग्रीनविच' किंवा 'झिरो डिग्री' रेष म्हणूनही ओळखली जाते. जिथं पूर्वेच्या दिशेला दर 1 अंशावर 4 मिनिटं वाढतात.
1 अंश पश्चिमेला मात्र वेळ 4 मिनिटांनी कायम कमी असतो. थोडक्यात इंग्लंडमध्ये रात्रीचे 12 वाजल्यास भारतात वेळ असते पहाटेचे 5.30/ साडेपाच.
त्यामुळं इथून पुढं या घड्याळाची वेळ कोण ठरवतं? असा प्रश्न विचारल्यास त्या मंडळींना ही माहिती नक्की द्या.