'यंदा द्विशतक!' कर्णधारपद गेल्यानंतर रोहितच्या 'अँग्री यंग मॅन' लूकची चर्चा

10 वर्षांमध्ये पहिल्यांदाच...

मुंबई इंडियन्सच्या संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा यंदा जवळपास एका दशकानंतर संघामध्ये अन्य खेळाडूच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे.

कर्णधार बदलल्याने वाद

संघ व्यवस्थापनाने कर्णधारपद हार्दिक पंड्याकडे सोपवल्याने मोठा वाद निर्णाण झाला. मात्र रोहितचा आपल्याला पाठिंबा असेल हार्दिकने म्हटलं आहे.

वादाच्या चर्चादरम्यान रोहितने पोस्ट केले फोटो

रोहित शर्माने मुंबईच्या संघाबरोबर सराव सुरु केल्यानंतर आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन काही फोटो शेअर केले आहेत.

एक शब्दही लिहिला नाही

सामान्यपणे आपल्या फोटोंना कॅप्शन देणाऱ्या रोहितने स्वत:चे सरावादरम्यानचे फोटो एका शब्दाचीही कॅप्शन न लिहिता पोस्ट केलेत.

उदास की संतापलेला?

या फोटोंमध्ये काही चाहत्यांना रोहित उदास वाटत आहे तर काहींना तो संतापलेला वाटतोय.

फटकेबाजी

एका फोटोत रोहित शर्मा फटकेबाजी करताना दिसत आहे.

रोहित आणि हार्दिकमध्ये वाद असल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगत असतानाच दुसरीकडे रोहितचे हे उदास वाटणारे फोटो पाहून चाहत्यांना रोहित सगळा राग गोलंदाजांवर काढणार असं वाटतं आहे.

यंदा रोहित द्विशतक झळकावणार

रोहितच्या या फोटोंखाली यंदाच्या आयपीएलमध्ये द्विशतक झळकावणार, यंदा गोलंदाजाचं काही खरं नाही अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी नोंदवल्या आहेत.

रोहित काय करतो हे येणारा काळच सांगेल

आता रोहित खरोखरच चाहत्यांच्या अपेक्षेप्रमाणे या पर्वामध्ये दमदार फटकेबाजी करतो की फ्लॉप ठरतो हे येणारा काळच सांगेल.

VIEW ALL

Read Next Story