इथला एक दिवस एका वर्षापेक्षाही मोठा असतो

सौरमालेत असा एक ग्रह जिथला दिवस हा तेथील वर्षापेक्षा मोठा असतो. याच ग्रहाबद्दलच्या रंजक गोष्टी जाणून घेऊयात

Swapnil Ghangale
Jul 21,2023

सिस्टर प्लॅनेट

शुक्र ग्रह आणि पृथ्वी दोघेही एकाच प्रकारचे ग्रह आहेत. शास्त्रज्ञ या दोन्ही ग्रहांना सिस्टर प्लॅनेट असं म्हणतात.

वैशिष्ट्यं असणारा ग्रह

शुक्र ग्रहाची काही वैशिष्ट्ये ही फारच थक्क करणारी आहे. या ग्रहासंदर्भातील काही गोष्टी या संपूर्ण सुर्यमालेतील कोणत्याच ग्रहाकडे नाहीत.

460 डिग्री सेल्सिअस तापमान

शुक्र ग्रहाच्या पृष्ठभागाचं तापमान 460 डिग्री सेल्सिअस इतकं आहे. म्हणजेच शुक्राच्या पृष्ठभागावर कोणतीही वस्तू ठेवली तर ती सहज विरघळून जाईल.

वातावरणीय दाब 90 पट अधिक

शुक्र ग्रहावरील वातावरणाचा दाब हा पृथ्वीवरील वातावरणीय दाबापेक्षा 90 पट अधिक आहे.

पश्चिमेकडे सुर्योदय आणि पूर्वेला सूर्यास्त

इतर ग्रहांशी तुलना केली तर शुक्र उलट्या दिशेने फिरतो. म्हणजेच या ग्रहावर पश्चिमेला सुर्योदय होतो आणि पूर्वेला सूर्यास्त!

724 किलोमीटर प्रती तास वेगाने वारे

शुक्र ग्रहावर वारेही प्रचंड वेगाने वाहतात. येथे 724 किलोमीटर प्रती तास वेगाने वारे वाहतात.

सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी 224 दिवस

शुक्राला सुर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी 224 दिवसांचा वेळ लागतो.

तब्बल 5 हजार 832 तासांचा कालावधी

मात्र शुक्राची स्वत: भोवती फिरण्याची गती फारच संथ आहे. शुक्राला स्वत: भोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी तब्बल 5 हजार 832 तास लागतात.

एक दिवस किती मोठा?

म्हणजेच अगदी सोप्या शब्दांमध्ये सांगायचं झालं तर शुक्रावारील एक दिवस हा पृथ्वीवरील 243 दिवसांइतका असतो.

शुक्रावरील दिवस हा वर्षापेक्षा मोठा

म्हणजेच अगदी सरळ हिशेब लावला तर शुक्रावरील दिवस हा तेथील वर्षापेक्षा अधिक मोठा असतो.

VIEW ALL

Read Next Story