Snow आणि Ice चा उच्चार होतो तेव्हा डोळ्यांसमोर बर्फ हीच संकल्पना उभी राहते. मुळात स्नो, आईस किंवा बर्फ पाण्यापासूनच तयार होतात.
पाण्याचं तापमान शुन्याहून कमी होऊन ते गोठण्याच्या बिंदूहूनही कमी झालं की ते गुणधर्म बदलण्यास सुरुवात करतं. पण, तरीही या दोन्ही गोष्टींमध्ये फार फरक आहे.
असं म्हणतात की स्नो, अर्था भुरभुरणारा बर्फ आईस, अर्थात बर्फाच्या खड्याहून कमी थंड असतो. मुळात पाण्याच्या तीन अवस्था असतात हे इथं लक्षात घेणं महत्त्वाचं. त्या म्हणजे स्थायु, द्रव आणि वायु.
ज्यावेळी द्रव पदार्थ कमी तापमानात गोठू लागतो तेव्हा तो स्थायूरुपात जातो. अर्थात टणक होतो. म्हणजेत स्नो आणखी थंड झााल की त्याचा ICE तयार होतो. या प्रक्रियेला Freezing असं म्हणतात.
पर्वतीय भागांमध्ये दिसणारा बर्फ हा द्रवापासून गोठलेला नसतो तर तो वातावरणातील वाफेपासून तयार झालेला असतो. वातावरणातील पाण्याचा अंश तापमान कमी झाल्यामुळं हा स्नो अर्था भुरभुरणारा बर्फ तयार होतो. या प्रक्रियेला Sublimation असं म्हणतात.
Snow किंवा Ice ला हात लावला असता तुमच्या हा फरक लगेचच लक्षात येईल की पाण्यापासून तयार झालेला बर्फ अधिक थंड असतो तर, स्नो तुलनेनं कमी थंड असतो.
स्नोमध्ये बर्फाचे अनेक सूक्ष्मकण असून त्याच्या पृष्ठाचं क्षेत्रफळ जास्त असतं. परिणामी ते उष्णता शोषून घेतात. ICE चे सूक्ष्मकण एकसंध असून, त्यात उष्णता शिरणं कठीण असतं. त्यामुळं तो स्नोपेक्षा जास्त थंड आणि टणक असतो.