कोहली पहिल्याच T-20 मध्ये मोडू शकतो 'हे' 3 'विराट' विक्रम; थक्क करणारी आकडेवारी पाहाच

11 जानेवारीपासून टी-20 मालिका

भारत आणि अफगाणिस्तानदरम्यान 11 जानेवारीपासून टी-20 मालिका सुरु होत आहे.

2022 च्या टी-20 वर्ल्ड कपनंतर पहिल्यांदाच...

2022 च्या टी-20 वर्ल्ड कपनंतर विराट कोहली पहिल्यांदाच अंतरराष्ट्रीय टी-20 सामना खेळणार आहे.

पुनरागमनासाठी उत्सुक

मागील 14 महिन्यांपासून टी-20 अंतरराष्ट्रीय सामने न खेळलेला विराट कोहली पुनरागमनासाठी उत्सुक आहे.

3 विक्रमांना गवसणी घालण्याची संधी

मात्र अफगाणिस्तानविरुद्धच्या या मालिकेमध्ये विराट 3 विक्रमांना गवसणी घालू शकतो. हे विक्रम कोणते पाहूयात...

अंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये सर्वाधिक धावा

विराटने अंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 4000 धावा केल्या आहेत. टी-20 मध्ये तो सर्वाधिक धावा करणारा क्रिकेटपटू आहे.

35 धावांची गरज

विराट कोहलीला टी-20 क्रिकेटमध्ये 12 हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी 35 धावांची गरज आहे.

99 अर्धशतकं

विराट कोहलीच्या नावावर टी-20 मध्ये 99 अर्धशतकं आहेत. अर्धशतकांचं शतक झळकावण्यासाठी त्याला एका अर्धशतकाची गरज आहे.

एक अर्धशतक झळकावलं तर...

केवळ डेव्हिड वॉर्नर आणि ख्रिस गेल या दोघांनाच टी-20 क्रिकेटमध्ये तिहेरी आकड्यामध्ये अर्धशतकं झळकावता आली आहेत. यात कोहलीचाही समावेश होईल.

28 चेंडू खेळला तर...

विराट अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत 28 चेंडू खेळला तर तो 9000 चेंडू खेळणारा तिसरा खेळाडू ठरेल.

विराट ठरणार तिसरा खेळाडू

यापूर्वी केवळ ख्रिस गेल आणि पाकिस्तानचा शोएब मलिक यांनाच हा पराक्रम जमलाय. त्यात लवकरच विराटाची समावेश होईल.

VIEW ALL

Read Next Story