दुबईत भारताच्या तुलनेत सोनं किती स्वस्त असतं? 10 ग्रॅम सोन्यासाठी किती मोजावे लागतात?

Jul 03,2024

भारतातून कोणी दुबईत गेलं तर सर्वात आधी सोन्याची खरेदी करतात.

आपल्या ओळखीतलं कोणी तिथे गेलं तर त्यांनाही सोनं आणा असं सांगितलं जातं.

पण तिथे भारताच्या तुलनेंत नेमकं सोनं किती स्वस्त मिळतं हे जाणून घ्या.

जर आजचा (3 जुलै) भाव किती आहे याबद्दल बोलायचं गेल्यास दुबईत 24 कॅरेट सोन्याचा दर 282.75 AED आहे.

भारतीय पैशांमध्ये बोलायचं गेल्यास हा दर 6430 रुपये प्रती ग्रॅम आहे. म्हणजे एक तोळं सोनं 64 हजार 300 रुपयांत मिळेल.

याशिवाय 22 कॅरेटचा दर 261.75 AED म्हणजेच 5952 रुपये प्रती ग्रॅम आहे. म्हणजे एका तोळ्यासाठी 59 हजार 520 रुपये मोजावे लागतील.

भारताशी तुलना करायची गेल्यास हा दर फार कमी आहे. म्हणजे तुम्ही 10 ग्रॅम सोनं खरेदी केलं तरी फार बचत करु शकता.

आज भारतात 24 कॅरेट सोन्याचा दर 6650 रुपये प्रती ग्रॅम आहे. म्हणजे एका तोळ्यासाठी 66 हजार 500 रुपये द्यावे लागतील.

म्हणजेच दुबईतील दर भारताच्या तुलनेत 6 हजार रुपये कमी आहे. पण तिथून सोनं आणण्यावर एक मर्यादा आहे.

अशात तुम्ही तिथे 10 ग्रॅमची चेन 60 हजारात (मेकिंग चार्ज व्यतिरिक्त) खरेदी करु शकता.

VIEW ALL

Read Next Story