देशातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी. त्यांची एकूण संपत्ती 110.9 बिलिअन अमेरिकन डॉलर इतकी आहे.
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर अदानी समुहाचे मालक गौतम अदानी यांचा क्रमांक लागतो. अदानी यांची एकूण संपत्ती 77.8 बिलिअन अमेरिकन डॉलर इतकी आहे.
जेएसडब्ल्यू ग्रुपच्या मालकिन सावित्री जिंदाल या श्रीमंत व्यक्तींच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती 36 बिलिअन अमेरिकन डॉलर इतकी आहे.
एससीएल टेक्नोलॉजीजचे मालक शिव नाडर श्रीमंत व्यक्तींच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती 30.7 बिलिअन अमेरिकन डॉलर इतकी आहे.
सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज लिमिटेडचे मालक दिलीप सांघवी हे पाचव्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकुण संपत्ती 23.9 बिलिअन अमेरिकन डॉलर इतकी आहे.
सीरम इन्स्टीट्यूटचे ऑफ इंडियाचे मालक सायरस पूनावाला यांची एकूण संपत्ती 21.3 बिलिअन अमेरिकन डॉलर इतकी आहे.
आदित्य बिरला ग्रुपचे मालक कुमार बिरला श्रीमंत व्यक्तींच्या यादीत सातव्या क्रमांकावर आहे. त्यांची संपत्ती 20.9 बिलिअन अमेरिकन डॉलर इतकी आहे.
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत आठव्या क्रमांकावर उद्योगपती राधाकिशन दमानी यांचा नंबर लागतो. त्यांची एकुण संपत्ती 20.6 बिलिअन अमेरिकन डॉलर इतकी आहे.
या यादीत नवव्या क्रमांकावर डीएलएफ लिमिटेडचे मालक कुशल पाल सिंह यांचा नंबर लागतो. त्यांची एकूण संपत्ती 17.3 बिलिअन अमेरिकन डॉलर इतकी आहे.
भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींमध्ये आर्सेलर कंपनीचे मालक लक्ष्मी मित्तल दहाव्या क्रमांकावर आहेत. मित्तल यांची एकूण संपत्ती 16.3 बिलिअन अमेरिकन डॉलर इतकी आहे.