'या' देशात एका व्यक्तीचे 14 पेक्षा जास्त बेड पार्टनर
आपल्या देशात आजही सेक्स याबद्दल खुलेपणाने बोललं जातं नाही. पण नुकताच एका सर्वेक्षणातून असं समोर आलं की, एका व्यक्तीचे किती सेक्स पार्टनर्स असू शकतात. त्यात धक्कादायक माहिती समोर आली आहे.
euroClinix या आरोग्य क्षेत्रातील कंपनीकडून सर्वेक्षण करण्यात आला आहे. यात ब्रिटनमधील 2000 लोक सहभागी झाले होते.
या सर्वेक्षणानुसार 25 टक्के लोकांनी दोन ते चार व्यक्तींशी सेक्स केला आहे. तर 14 टक्के लोकांनी फक्त एकाच व्यक्तीसोबत सेक्स केल्याचा या अहवालातून समोर आलं आहे.
तर 2 टक्के लोकांनी जवळपास 91 पेक्षा जास्त पार्टनर्ससोबत सेक्स केल्याचं कबूल केलंय. तर 4 टक्के लोकांनी आपण अनेक जणांसोबत सेक्स केला पण त्याची आकडे कधीच मोजले नाहीत.
वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सने केल्या अभ्यासातून असं समोर आलं की, तुर्कीमधील लोक सरासरी 14.5 पर्यंत बेड पार्टनर ठेवतात.
यात भारताचं बोलयाचं झालं तर, भारताचा खूपच कमी आहे म्हणजे सरासरी तीन बेड पार्टनर ठेवले जातात.
तुर्कीनंतर ऑस्ट्रेलियात 13.3, न्यूझीलंडमध्ये 13.2, आइसलँडमध्ये 13 आणि दक्षिण आफ्रिकेत सरासरी 12.5 लैंगिक भागीदार आहेत.
अमेरिका आणि कॅनडाबद्दल बोलायचं झाल्यास, इथे सरासरी लैंगिक भागीदार 10.7 आहे. तर चीनमध्ये लैंगिक भागीदारांची सरासरी संख्या भारताच्या तुलनेत थोडी जास्त आहे म्हणजे 3.1 इतकी आहे.