हिंदू धर्मात तुळस हि पवित्र मानली जाते. रोज सकाळी तुळशीची पूजा केली जाते. मात्र, त्याचबरोबर तुळस ही आरोग्यकारीही मानली जाते.
रिकाम्या पोटी तुळस खाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. मग तुळशीचा काढा किंवा डिटॉक्स वॉटरमध्येही तुम्ही त्याचा समावेश करु शकता.
तुळशीच्या पानात गुणकारी तत्व असतात. यात असणारे अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल आणि अँटी-व्हायरल गुणधर्म रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात
तुळशीची पाने आपल्या पोटासाठी खूप फायदेशीर असतात. तुळशीची पाने खाण्याने अॅसिडिटी, गॅस दूर होते. पचनक्रिया सुधारते.
तुळशीच्या पानात बाॅडी डिटाॅक्स करण्याची क्षमता असते. यातील गुणकारी तत्व शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतात.
सर्दी-खोकला झाला असल्यास रोज सकाळी नियमित तुळशीची पाने खा. त्यामुळं आजारापासून लढण्यास मदत होते.
तुळशीची पाने नियमित खाण्य़ाने तणाव दूर होतो.पानांमध्ये अॅडाप्टोजेन असतात जे मानसिक तणाव कमी करतात
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)