कोंबडी आधी की अंड?

कोंबडी आधी की अंड? अखेर या जागतिक प्रश्नाचं उत्तर सापडलं; शास्त्रज्ञ उदाहरणासह म्हणाले...

तुम्हाला पडला का हा प्रश्न?

आधी अंड आलं की आधी कोंबडी? हा पेचात पाडणारा प्रश्न तुम्हाला कधीतरी कोणीतरी विचारलाच असेल.

मिळालं या प्रश्नाचं उत्तर

मुळात या प्रश्नाचं उत्तर आतापर्यंत कोणालाही सापडलेलं नाही. पण, काही शास्त्रज्ञांनी मात्र हे उत्तर शोधण्याचा एक चांगला आणि प्रशंसनीय प्रयत्न केला आहे.

शास्त्रज्ञांचा दावा

ब्रिस्टल विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी एक वेगळाच संदर्भ देत हैराण करणारे सिद्धांत जगासमोर मांडले आहेत.

अंड आधी आलंच नव्हतं...

शास्त्रज्ञांनी केलेल्या दाव्यानुसार जगात सर्वप्रथम अंड नव्हे तर कोंबडी किंवा कोंबडाच आला होता.

आधी कोंबडी अशी नव्हती..

शास्त्रज्ञांनी फक्त हा दावाच केला नाही तर त्यांनी दिलेल्या माहितीनुसार कैक हजार वर्षांपूर्वी कोंबडा आणि कोंबडी जसे आज दिसतात तसे दिसत नव्हते.

तेव्हा पिलांचा जन्म होत होता

ही प्रजाती अंडी देत नसून, त्या काळात पिलांना जन्म देत होती. ज्यानंतर त्यांच्यात बदल होत गेला.

शरीररचनेत बदल

काळानुरुप त्यांच्या शरीररचनेत बदल होऊन अंड देण्याची क्षमता विकसित झाली. ज्यामुळं या जगात सर्वप्रथम अंड नव्हे तर कोंबडा आणि कोंबडी आली.

जन्म देण्याच्या पद्धतींमध्ये विभिन्नता

संशोधकांच्या म्हणण्यानुसार मुलांना जन्म देण्याच्या पद्धतींमध्ये विभिन्नता असण्यामागे एक्सटेंडेड एम्ब्रायो रेटेंशन हे एक प्रमुख कारण आहे.

एक अनोखी गोष्ट

अनेक असे प्राणी अंड देतात तेव्हा त्यात भ्रूण विकसित झालेलं नसून, ते कालांतरानं विकसित होतं. तर, काही जीव अंडी देतात तेव्हा त्यात भ्रूण विकसित झालेलं असतं.

प्रश्नाचं उत्तर सापडलं...

थोडक्यात शास्त्रज्ञांच्या या संशोधनातून समोर आलेल्या या माहितीतून किमान काही अंशी तरी या प्रश्नाची उकल झाली आहे.

VIEW ALL

Read Next Story