बल्ब बदलणे हे एक काम असू शकते असा तुम्ही कधीच विचार केला नसेल. तुम्ही म्हणाल की एवढ्या साध्या कामासाठी 16 लाख रुपये का देईल?
केविन श्मिट नावाच्या व्यक्तीला या विचित्र कामासाठी लाखोंचा पगार मिळत आहे. केविनच्या या कामाचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये तो बल्ब बदलताना दिसतो.
हा बल्ब कोणत्याही सामान्य ठिकाणी नसून एका टॉवरवर लावलेला आहे. केविन टॉवरवर चढतो आणि बल्ब बदलतो. त्यासाठी त्याला 16 लाख रुपये इतकं मानधन मिळतं
बल्ब बदलण्यासाठी टेलिव्हिजनच्या ब्रॉडकास्ट अँटेनाच्या वर चढावे लागते. अमेरिकेतील साउथ डकोटा येथे हा टॉवर असल्याचे सांगितले जात आहे.
विमानातून उड्डाण करणाऱ्या वैमानिकांना येथे एक टॉवर आहे हे कळण्यासाठी त्यावर बल्ब लावण्यात आले आहेत. केविन दर सहा महिन्यांनी या टॉवरचे बल्ब बदलतो.
प्रत्येक चढाईसाठी केविनला 20000 डॉलर्स मिळतात,त्याने गेल्या आठ वर्षांत सुमारे 12 राज्यांमध्ये अशा शेकडो टॉवर्सवर चढाई केली आहे.
ज्या टॉवरवर हा बल्ब बदलावा लागला तो सुमारे 1500 फूट उंच आहे. या टॉवरची उंची पाहून सगळ्यांनाच धडकी बसू शकते. (सर्व फोटो - insidehistory/ instagram)