एकदोन नव्हे, 'या' देशात आहेत तब्बल 72 ऋतू
ऋतू म्हटलं की, हिवाळा , पावसाळा आणि उन्हाळा असं उत्तर चटकन दिलं जातं.
आश्चर्याची बाब म्हणजे याव्यतिरिक्त इतरही असे काही ऋतू आहेत जे इतर देशांमध्ये बरेच बदल घडवून आणताना दिसतात.
चीनमधील दिनदर्शिकांमध्ये 24 ऋतूंचा उल्लेख आढळतो. तर, जपानमध्ये एकदोन नव्हे, तब्बल 72 ऋतू असतात.
को असं या जपानी संकल्पनेचं नाव. हा ऋतू दर पाच दिवसांनी बदलतो.
ऋतूचक्रातील हे बदल संगीतरचनेनुसार निसर्गचक्रातील बारकावे अधोरेखित करतो.
जपानमधील या ऋतूंना रिशुन, उसुई, रिक्का, शोमोन, सोको, रिट्टो, शोशेत्सु, ताईसेत्सु अशी नावं आहेत.