1498 साली समुद्रमार्गानं वास्को-द-गामा भारतात आला होता. तो या देशात सागरी मार्गानं येणारा पहिला इसम होता.
आफ्रीका खंडाच्या बंदरावर वास्को-द-गामाची ओळख एका गुजराती व्यापाऱ्याशी झाली आणि त्याच्याच मदतीनं तो भारतात आला होता.
अब्दुल मजीद नावाच्या गुजराती व्यापाऱ्यानं वास्को-द-गामाला भारतात येण्यासाठी मदत केली होती.
भारतात आल्यावर वास्को-द-गामा सर्वात आधी केरळच्या कोझिकोडमधील कालिकत गावाच्या राजाला भेटला होता.
वास्को द गामा भारतात इसवी सन 1498 , इसवी सन 1501 आणि इसवी सन 1524 मध्ये आला होता. 1524 दरम्यानच्या प्रवासात तो आजारी पडला आणि कोचीनमध्ये मरण पावला.
वास्को-द-गामाला भारतात व्यापारी संबंध बनवता आले नाहीत. पण, भारतात समुद्रमार्गाच्या शोधाने व्यापाराला नवी दिशा दिली.
समुद्रमार्गाच्या शोधामुळे ब्रिटिशांना भारतात साम्राज्यवादासाठी सोपा मार्ग सापडला.