अवकाशात 8 महिन्यांपासून हरवलेला टोमॅटो अखेर कुठे सापडला माहितीये?
अवकाशात Frank Rubio या अंतराळवीरानं केलेल्या एका प्रयोगादरम्यान मार्च महिन्यात एक टोमॅटो हरवला होता.
veg 5 असं या प्रयोगाचं नाव देण्यात आलं होतं. पण, या प्रयोगादरम्यानच तो टोमॅटो हरवला
मार्च महिन्यापासूनच अंतराळवीर या टोमॅटोचा शोध घेत होते. सरतेशेवटी 8 महिन्यांनंतर हा टोमॅटो सापडला.
आश्चर्याची बाब म्हणजे हा टोमॅटो अंतराळातच होता. नासाच्याच एका अंतराळवीरानं याबाबतची माहिती दिली.
जॅस्मिन मोघबोलीच्या माहितीनुसार या रहस्याचा उलगडा आता झाला आहे. थोडक्यात अवकाशात हरवलेला टोमॅटो तिथंच सापडला आहे.