ध्रुवीय बर्फ वितळल्यास पृथ्वीवरील जीवसृष्टीवर 'असा' होईल परिणाम

Jul 19,2024


सततच्या हवामानातील बदलांमुळे ध्रुवावर साचलेला बर्फ वितळत आहे. याचा परिणाम पृथ्वीचा वेगावर दिसून येत आहे. पृथ्वीचा वेग मंदावला आहे ज्यामुळे दिवस अभूतपूर्व' वेगाने मोठे होत आहेत.


पृथ्वीचा फिरण्याचा वेग हा पृथ्वीवरील दिवसाची लांबी ठरवतो, एका नवीन अभ्यासानुसार असे समोर आले की, पृथ्वीचा हाच वेग कमी झाल्याने दिवस मोठा होत आहे. अभ्यासात या बदलाचे वर्णन मानवी हवामान बदलाचा परिणाम म्हणून करण्यात आला आहे.


नवीन संशोधन असे सांगते की, हवामान बदलाचा प्रभाव दिवस मोठा होण्याच्या कल्पनेहूनधी अधिक गंभीर असू शकतो.


जागतिक तापमानवाढीमुळे ध्रुवीय बर्फ झपाट्याने वितळत असल्याचे संशोधनातून दिसून आले आहे. आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या एका गटाने 1900 ते 2100 या काळात 200 वर्षांचा अभ्यास केला.


20 व्या शतकात, हवामान बदलामुळे समुद्राच्या पातळीत वाढ झाल्यामुळे दिवसाच्या लांबीमध्ये 0.3 ते 1 मिलीसेकंद इतका फरक पडल्याचे आढळून आले.


तर गेल्या 20 वर्षात संशोधकांना असे आढळून आले की दिवसाची लांबी प्रति शतकात 1.33 मिलिसेकंदने वाढली आहे तर 20 व्या शतकातील वेळेपेक्षा अधिक लक्षणीय असल्याचे अहवालात म्हटले आहे.


दिवस मोठा होण्यातील हा फरक हा काही मिलिसेकंदचा असला तरी त्याचा पृथ्वीवर फार मोठा परिणाम होऊ शकतो. नासा जेपीएलचे अधिकारी सुरेंद्र यांनी एएफपीला सांगितले की या बदलांमुळे जीपीएस नेव्हिगेशन, आर्थिक व्यवहार आणि इंटरनेट ट्रॅफिकमध्ये व्यत्यय येण्याची शक्यता आहे, कारण या सर्व गोष्टींसाठी अचूक वेळेची गरज लागते.

VIEW ALL

Read Next Story