लैंगिक अत्याचारासंदर्भात तसेच अल्पवयीन मुलांमधील लैंगिक अत्याचारासारख्या वाढत्या गुन्हेगारीबद्दल बोलताना लैंगिक संबंध ठेवण्याचं संमतीचं वय कायम चर्चेत असतं. (सर्व फोटो प्रातिनिधिक)
भारतामध्ये लैंगिक संबंध ठेवण्यासाठी संमतीचं वय हे 18 इतकं आहे.
म्हणजेच भारतात कायदेशीररित्या लैंगिक संबंध ठेवण्यासाठी ती व्यक्ती किमान 18 वर्षांची असणं आवश्यक आहे. यालाच अन्य भाषेत सज्ञान असंही म्हणतात.
मात्र हे वय बदलण्यासंदर्भातील चर्चा अनेकदा केली जाते. वाढती गुन्हेगारी आणि शारीरिक बदल पाहता हे वय 16 असवं असं काही तज्ज्ञांचं मत आहे.
भारतात या विषयी चर्चा असतानाच जगात एक असा देश आहे जिथे लैंगिक संबंध ठेवण्याचं वय हे अवघं 11 वर्ष इतकं आहे.
लैंगिक संबंध ठेवण्यासाठीचं संमतीचं वय म्हणजेच एज ऑफ कन्सेंट 11 असणाऱ्या देशाचं नाव आहे नायझेरिया.
याचप्रमाणे फिलिपिन्समध्ये आणि अँजलो नावाच्या देशात लैंगिक संमतीचं वय अवघं 12 वर्ष आहे.
तर नायझर, कोमोरोस आणि बुर्किना फासो या देशांमध्ये लैंगिक संबंध ठेवण्याचं संमतीचं वय 13 वर्ष इतकं आहे.