चेहऱ्यावरचे नको असलेले केस काढण्यासाठी वापरा 'ही' सोपी ट्रीक

शरीरातील हार्मोन्सच्या बदलामुळे स्त्रियांना चेहऱ्यावर अतिरिक्त केस येतात. ओठांच्या वरच्या बाजूला किंवा गालांवर दाट केस येतात.

अनियमित मासिकपाळीमुळे देखील स्त्रियांना चेहऱ्यावर आणि हातावर खूप केस येतात. त्यामुळे बऱ्याच जणी पार्लरमध्ये जाऊन वॅक्स करतात.

वॅक्सिंगमुळे त्वचेला हानी पोहोचते, म्हणून पार्लरमध्ये न जाता घरच्या घरी सोप्या ट्रीक वापरुन तुम्ही चेहऱ्यावरचे नको असलेले केस काढून टाकू शकता.

हळद आणि बेसन

चेहऱ्याचा रंग सुधारण्यासोबत हळद आणि बेसन चेहऱ्यावरचे केस काढण्यासाठी मदत करतात.

हळद आणि बेसन एकत्र करुन ही पेस्ट हलक्या हाताने चेहऱ्यावर मसाज करा.काही दिवसातच नको असलेले केस हळूहळू कमी होतील.

तांदळाचं पीठ आणि मीठ

तांदळाचं पीठ आणि मीठ एकत्र करुन याची पेस्ट चेहऱ्यावर लावा. तांदळांच पीठ खरखरीत असल्याने हलक्या हातानेच चेहऱ्यावर मसाज करा.

काही वेळ तसंच ठेवल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. असं तुम्ही आठवड्यातून दोनदा करु शकता. (Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story