तुम्ही कधी खाल्ली आहे का, ही भाजी?
जगातील सर्वात महागडी अशी ही भाजी म्हणजे, ट्रफल, इटालियन व्हाईट ट्रफल.
जमिनीखाली उगवणारी ही भाजी शोधणंच मुळात अतिशय कठीण काम. ज्यामुळं या भाजीला इतकी किंमत मोजली जाते.
2022 मध्ये 900 ग्राम व्हाईट ट्रफलची किंमत होती 15 लाख रुपये. या भाजीची चव आणि सुवास अतिशय कमाल येतो.
ही भाजी मुख्यत्वे इटलीच्या पिडमोंट, टस्कनी आणि उम्ब्रिया या क्षेत्रांमध्ये उगवते. एक्झॉटीक पदार्थांमध्ये हे व्हाईट ट्रफल वापरले जातात.
आरोग्यासाठीही ट्रफल अतिशय फायद्याचे. यामध्ये अँटीऑक्सिडंट, प्रोटीन आणि विविध प्रकारचे विटामिन्स आढळतात.