जगातील सर्वात शुद्ध हवा इथंच...

जगातील किंबहुना पृथ्वीवरीस सर्वाधिक शुद्ध हवा पृथ्वीच्या टोकाशी असणाऱ्या एका ठिकाणी आहे.

तस्मानिया

ऑस्ट्रेलियातील तस्मानियाच्या उत्तर पश्चिमेला हे ठिकाण असून, या ठिकाणाचं नाव आहे केप ग्रिम. या भागात मानवी हस्तक्षेप तसा कमीच असल्यामुळं इथं पृथ्वीवरील सर्वाधिक शुद्ध हवा आहे.

केप ग्रिम

केप ग्रिम हे ठिकाण पृथ्वीच्या टोकाशी आहे. इथं येणाऱ्यांची संख्या कमी असली तरीही जी मंडळी इथं येतात ती भारावून जातात.

प्रदूषणाच्या समस्या

सध्याच्या घडीला जिथं प्रदूषणाच्या असंख्य समस्या भेडसावत आहेत तिथं हे ठिकाण आकर्षणाचा विषय ठरत आहे.

ताशी 180 किमी वेगानं वारे

वाऱ्याच्या प्रचंड झोतांसाठी हे ठिकाण ओळखलं जातं. इथं ताशी 180 किमी इतक्या वेगानंही वारे वाहतात.

शुद्ध हवेचा पुरवठा

जिथं स्वच्छ हवेची कमतरता आहे अशा भागांनाही केप ग्रिमपासूनच हवा मिळते.

विश्वास बसणार नाही

तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण इथल्या हवेला बाटलीत भरून तिची विक्रीसुद्धा केली जाते.

VIEW ALL

Read Next Story