टायटॅनिकचे अवशेष पाहण्यासाठी पाच जण उत्तर अटलांटिकाच्या समुद्रात गेले
एका छोट्या पाणबुडीच्या सहाय्याने पाच जण समुद्रात उतरले
मात्र, समुद्राच्या तळाशी जात असताना पाणबुडीचा संपर्क तुटला अन् पाच जण बेपत्ता झाले
कॅनडा, अमेरिकातील संरक्षण दल बेपत्ता पाणबुडीआणि त्यातील लोकांचा शोध घेत आहेत
पाणबुडीमध्ये तीन ते चार दिवसांपर्यंतचाच ऑक्सिजन आहे
पाणबुडी कॅनडातील न्यूफाउंडलँट किनाऱ्यापासून काहीच अंतरावर असताना कंट्रोल रुमसोबत असलेला संपर्क तुटला
बेपत्ता पाणबुडीचं वजन हे 10 हजार किलोपेक्षा अधिक आहे
ब्रिटनचे अरबपती हामिश हार्डिंग, पाकिस्तानचे उद्योजक शहजादा दाऊद आणि त्यांचा मुलगा हे या पाणबुडीत प्रवास करत होते
या पाणबुडीत 77 वर्षांचे संशोधक पॉल- हेनरी नार्गोलेट देखील आहेत
टायटॅनिकला जलसमाधी मिळाल्यानंतर 1985मध्ये तिचे अवशेष मिळाले होते.