निरोगी आणि फिट राहण्यासाठी 'ही' 6 आसनं रोज करा

जर तुम्हाला निरोगी आणि फिट राहायचं असेल तर ही 6 आसनं रोज करा. तुम्हाला अनपेक्षित असा निकाल पाहायला मिळेल.

वज्रासन

या आसनाचा पचनक्रियेसाठी चांगला फायदा होतो. बौद्धकोष्टतेर मात करण्यास तसंच पेल्विक स्नायू मजबूत करण्यात मदत होते.

नौकासन

या आसनाला बोट पोझ किंवा परिपूर्ण नवासन असंही म्हटलं जातं. हे आसन मुख्यत्वे शरिरातील साखरेचं प्रमाण नीट ठेवण्यात आणि ओटीपोटातील स्नायू मजबूत करण्यास मदत करते.

हे आसन कोणी टाळावं?

पण पाठ, मान किंवा गुडघ्याची जखम असणाऱ्यांनी हे आसन करण्याचा प्रयत्न करु नये.

सुखासन

सुखासनला Happy किंवा Easy पोझ असंही म्हटलं जातं. बसल्या जागी हे आसन करु शकता. तुम्ही रोज बसल्या जागीही हे आसन करु शकता.

मनाची शांती

या असानामुळे तुमच्या मनाला शांतता मिळते. यामुळे तुमच्या मनावरीत तणाव आणि भीती कमी होऊन एकाग्रता वाढते.

पदहस्तसन

आपलं वजन आणि वाढलेलं पोट कमी करण्यासाठी हे एक उत्तम आसन आहे.

पद्मासन

कमळाच्या आकारात बसत केलं जाणारं हे आसन तुम्हाला पचनासाठी मदत करतं. तसंच बद्धकोष्ठता आणि पचनक्रियेतील समस्यांवर मात करतं.

हाडांसाठी उत्तम

तुमचे सांधे आणि हाडं मजबूत करण्यासाठी हे उत्तम आसन आहे. यशिवाय हे आसन पीरियड क्रॅम्समधूनही दिलासा देतं.

शवासन

मृतावस्थेत असल्याप्रमाणे झोपून केलं जात असल्याने त्याला शवासन म्हणतात. योगा सेशनच्या शेवटी हे आसन केलं जातं.

फायदा काय?

उत्तम आरोग्यासाठी हे सर्वात उपयुक्त आसन आहे. हे अत्यंत आराम देणारं आसन आहे.

VIEW ALL

Read Next Story