जिथून टेक ऑफ तिथेच लँडींग; 9 तासांच्या उड्डाणात घडलं तरी काय?

ड्रीमलायनर

बोईंग 787-9 ड्रीमलायनर विमान लंडनहून ह्यूस्टन अमेरिकेला निघालं होतं. 300 प्रवासी आणि क्रू मेंबरना घेऊन निघालेल्या या विमानाचं सुरक्षित लँडिंग करण्यात आलं.

विमानानं उड्डाण

9 तासांसाठी या विमानानं उड्डाण भरलं, पण ते कुठंही पोहोचलं नाही. उलटपक्षी ते जिथून निघालं होतं तिथंच पुन्हा येऊन पोहोचलं.

न्यूफाऊंडलँड

हे विमान अटलांटिक महासागर ओलांडून न्यूफाऊंडलँडला पोहोचणार होतं. तितक्यातच विमानात काही तांत्रिक अडचणी आल्याचं पायलटच्या लक्षात आलं.

इंजिनमध्ये बिघाड

विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड असल्याचं लक्षात येताच ते मागे वळवण्यात आलं. तब्बल 9 तासांच्या या प्रवासात ये-जा करताना या विमानानं 7000 किमी अंतर ओलांडलं.

विमान प्रवास

झाल्या प्रकाराबद्दल एअरलाईनकडून प्रवाशांची माफी मागत त्यांना पुढील प्रवासासाठी विमान तिकीटाची तरतूद करून देण्यात आली.

विमानाचं इंजिन

प्राथमिक माहितीनुसार रोल्स रॉयल्सकडून ब्रिटीश एअरवेजच्या या विमानाचं इंजिन तयार करण्यात आलं होतं.

VIEW ALL

Read Next Story