'या' चित्रपटात शाहरुख खान 2 तासांमध्ये एकही डायलॉग बोलला नाही अन्...

शाहरुखचे संवाद

'राहुल, नाम तो सुना होगा?' किंवा '70 मिनट है तुम्हारे पास... 70 मिनट' डायलॉग म्हटले तर डोळ्यासमोर येतो तो शाहरुख खान!

व्हर्सेटाइल अभिनेता

रोमान्स असो, बायोपिक असो किंवा ड्रामा असो कोणत्याही प्रकारची भूमिका साकारणाऱ्या शाहरुख खानच्या तोंडचे अनेक संवाद चाहत्यांना तोंडपाठ आहेत.

सुरुवातीला नकारात्मक भूमिका

खरं तर 1990 च्या दशकामध्ये शाहरुख नकारात्मक भूमिकांकडून रोमँटिक भूमिकांकडे वळला आणि 'लाखो दिलों की धडकन' झाला.

भूमिका कायम लक्षात राहिली

1997 साली शाहरुखच्या या रोमँटिक चित्रपटांच्या मालिकेत एक चित्रपट आला होता. ज्यामधील शाहरुखची भूमिका कायम लक्षात राहिली.

120 मिनिटं एकही संवाद नाही

विशेष म्हणजे या 160 मिनिटांच्या चित्रपटामध्ये शाहरुख मुख्य भूमिकेमध्ये होता तरी त्याला फारसे संवाद देण्यात आले नव्हते. त्याच्या भूमिकेला 120 मिनिटं एकही संवाद नव्हता. या चित्रपटात तो केवळ शेवटची 40 मिनिटं बोलला.

हा चित्रपट कोणता?

आता हा चित्रपट कोणता असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर या चित्रपटाचं नाव आहे, 'कोयला'! अभिनेत्री माधुरी दिक्षितने मुख्य अभिनेत्रीची तर अम्रिश पुरी यांनी खलनायकाची भूमिका साकारली होती.

कोणती भूमिका?

या चित्रपटामध्ये शाहरुखने एका मुक्या नोकराची भूमिका साकारली होती. लहानपणी तोंडात गरम कोळसा घातल्याने त्याच्या व्होकल कॉर्ड दुखावल्याने तो मुका होतो असं दाखवण्यात आलेलं.

पुन्हा बोलता येतं

मात्र चित्रपटाच्या शेवटी एका मोठ्या अपघातानंतर इलाजादरम्यान शाहरुखला पुन्हा बोलता येतं, असं या चित्रपटाचं कथानक आहे.

फारसा चालला नाही

खरं तर शाहरुख आणि माधुरी असूनही 'कोयला' चित्रपट तिकीटबारीवर फारसा चालला नव्हता. त्याला सर्वसाधारण कमाई करता आली.

अर्ध्याहून अधिक काळ शांतच

मात्र चित्रपटातील 75 टक्क्यांहून अधिक वेळ शाहरुख मुक्या व्यक्तीची भूमिका साकारताना केवळ तोंडातून आवाज काढत होता. शेवटच्या 40 मिनिटांसाठी त्याला संवाद देण्यात आलेले.

कोणताही संवाद नसणारा चित्रपट

बॉलिवूडमध्ये शाहरुखसारख्या एवढ्या मोठ्या कलाकाराला अशी कोणतीही संवाद नसणारी भूमिका साकारण्याची संधी फारच क्वचित मिळते. शाहरुखने ही संधी स्वीकारली आणि त्याचं सोनं केलं.

VIEW ALL

Read Next Story