जर तुम्हाला भटकंतीची आवड असेल तर आज आपण अशा देशांबद्दल जाणून घेणार आहोत जेथील लाइफ क्वालिटी जगात भारी आहे.
या देशांमधील गुन्हेगारीचं प्रमाण फार कमी आहे. येथील आरोग्य यंत्रणा फारच उत्तम असून येथील प्रदूषणही फार कमी आहे.
लक्झ्मबर्ग - सुरक्षा, वातावरण यासंदर्भात लक्झ्मबर्ग हा देश या यादीत अव्वल स्थानी आहे. येथील प्रदूषणाचं प्रमाण फार कमी आहे.
लक्झ्मबर्गमधील लाईफस्टाइलची क्वॉलिटीही उत्तम आहे. जगातील सर्वात सुरक्षित देशांपैकी हा एक आहे.
नेदरलॅण्ड - राहण्याच्या बाबतीत विचार केल्यास नेदरलॅण्डही सर्वात उत्तम देशांपैकी एक आहे. येथील हवामान उत्तम असून प्रदूषण कमी आहे.
आईसलॅण्ड - आईसलॅण्डमधील लाइफ क्वॉलिटीही उत्तम आहे. येथील हवामान उत्तम आहे. या ठिकाणी प्रदूषणही फार कमी आहे. येथील आरोग्य व्यवस्थाही फारच उत्तम आहे.
डेन्मार्क - लाइफ क्वॉलिटीच्या दृष्टीकोनातून डेन्मार्कही फार उत्तम देश आहे. येथील हवामान फारच छान असून प्रदुषणाचं प्रमाण कमी आहे. येथील आरोग्य व्यवस्थाही फारच अत्याधुनिक आहे.
फिनलॅण्ड- लाइफ क्वॉलिटी उत्तम असलेल्या देशांमध्ये फिनलॅण्डचाही समावेश आहे.
जगातिक सर्वात आनंदी लोकांमध्ये फिनलॅण्डमधील लोकांचा म्हणजेच 'फिन्स'चा समावेश होतो.
स्वित्झर्लंड- उत्तम आयुष्य जगण्याच्या दृष्टीने स्वित्झर्लंडही अव्वल देशांपैकी एक आहे.
स्वित्झर्लंडमधील आरोग्य व्यवस्था फार अथ्याधुनिक असून या देशातील नागरिक फार आनंदी असतात.
ओमान - ओमानमध्ये गरिबांची संख्या फार कमी आहे. येथील लाइफ क्वॉलिटी आणि लाइफस्टाइल फारच आधुनिक असून नागरिकांसाठी उत्तम दर्जाच्या सेवा दिल्या जातात.
ऑस्ट्रिया - आपल्या निसर्गाची उत्तम प्रकारे काळजी घेऊन विकास करणारा देश म्हणून ऑस्ट्रियाकडे पाहिलं जातं.
ऑस्ट्रियाची लाइफ क्वॉलिटी फारच उत्तम आहे. ऑस्ट्रियामधील प्रदुषणाचं प्रमाण कमी आहे.
मात्र येथील कॉस्ट ऑफ लिव्हिंग फार अधिक आहे. भारत या 84 देशांच्या यादीत 56 व्या क्रमांकावर आहे.