चंद्रावर शॉपिंग मॉल असतील तर, ते काहीसे असेच दिसलीत. अतिशय वैविध्यपूर्ण बांधणी आणि तंत्रज्ञानाची इथं सांगड घातलेली असेल.
चंद्रावर बाजारपेठाही असतील जिथं तिथली लोकवस्ती खरेदीसाठी गर्दी करताना दिसेल. एआयच्या मते चंद्रावरील बाजारपेठा काहीशा अशा दिसतील.
चंद्रावरही मानवी वस्ती असल्यास तिथं शहर आणि खेड्याचा भाग दिसू शकतो. खेडं असंच काहीसं दिसेल ना...
चंद्रावरील जगण्याची बातच न्यारी असेल. इथून दिसणारं आभाळही ततिकंच वेगळं आणि चमत्कारिक असेल.
ज्याप्रमाणं आपल्या अवतीभोवती गगनचुंबी इमारतींचा गराडा आहे अगदी त्याचप्रमाणं चंद्रावरही अशा इमारती दिसतील तो दिवस दूर नाही असंच म्हणावं लागेल.
चंद्राच्या धरतीवर एखाद्या बाईकस्वाराला बाईक चालवायची असल्यास त्याला काहीशाी अशीच तयारी करावी लागणार आहे.
एआयच्या फोटोंमध्ये दिसत असल्यानुसार चंद्रावरील घरांचा आकार साधारण बर्फाच्छादीत प्रदेशातील इग्लूप्रमाणं असेल.
तुम्हाला माहितीये का, चंद्रावर ऑक्सिजन आणि गुरुत्वाकर्षण कमी असल्यामुळं तिथं नव्यानं आयुष्य अस्तित्वात येणंही आव्हानात्मक असेल हे नाकारता येणार नाही.