गेल्या काही आठवड्यांपासून सोन्याचा दरात वेगाने वाढ होताना दिसत आहे.
या आठवड्याच्या शेवटच्या व्यवहार दिनी म्हणजेच शुक्रवारी सोन्याचा दर 59 हजार 610 रुपये प्रती 10 ग्रॅम झाला.
गेल्या आठड्याच्या शेवटच्या व्यवहार दिनी हा दर 59 हजार 352 रुपये प्रती 10 ग्रॅम झाला होता.
IBJA Rates नुसार, या आठवड्याच्या पहिल्या व्यवहार दिनी म्हणजेच सोमवारी सोन्याचा दर 59 हजार 265 रुपये झाला आहे.
मंगळवारी दरात थोडीशी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आणि दर प्रती 10 ग्रॅम 59 हजार 330 रुपये झाला.
बुधवारी सोन्याचा दर 59 हजार 859 आणि गुरुवारी 59 हजार 908 रुपये इतका होता.
गेल्या आठवड्यातील 59 हजार 352 चा दर पाहता या आठवड्यात सोनं प्रती 10 ग्रॅम 258 रुपये महाग झालं आहे
पण महत्त्वाची बाब म्हणजे, सोन्याचा दर गुरुवारी 59 हजार 908 रुपये होता. शुक्रवारी हा दर 59 हजार 610 रुपये झाला.
अशाप्रकारे सोन्याच्या दरात एकाच दिवसात 10 ग्रॅममागे 298 रुपयांची घट झाली आहे.