10 Facts: देशातल्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले

सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी १८३१ साली महाराष्ट्राच्या सातारा जिल्हातील नायगाव या गावात झाला. त्यांच्या आईच नाव लक्ष्मीबाई आणि वडिलांचं नाव खंडोजी होतं.

सावित्रीबाईंचा जन्मदिवस महिला मुक्तीदिन म्हणून साजरा केला जातो.

सावित्रीबाई नऊ वर्षांच्या असताना त्यांच लग्न जोतिबा फुले यांच्याशी झालं. त्यावेळी जोतिबा फुलेंच वय १३ वर्ष होतं.

जोतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी 1 जानेवारी 1848 मध्ये महाराष्ट्रमधील पुणे येथील बुधवार पेठेतील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. शाळेमध्ये सुरवातीला 6 मुली होत्या नंतर ही संख्या 45 पर्यंत पोहचली होती.

जोतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी अवघ्या चार वर्षांत मुलींसाठी 18 शाळा उघडल्या.

सावित्रीबाई फुले यांनी पुनर्विवाहाचा कायदा होण्यासाठी प्रयत्न केले.

सावित्रीबाई उत्तम लेखिका होत्या त्यांनी मराठी भाषेत लेखन केलं आहे. त्यांनी त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून विचारांचा प्रसार केला.

काव्यफुले आणि बावनकशी, सुबोध रत्नाकर हे काव्यसंग्राह त्यांनी लिहिले. शिक्षण मिळवा नावाची कविता त्यांनी प्रकाशीत केली होती.

1896 साली पुणेमध्ये प्लेगच्या साथीने थैमान घातलं होतं. प्लेगची लागण झाल्याने अनेक जण मृत्यूमुखी होत होते. सावित्रीबाईंनी पुण्यामध्ये प्लेग पीडितांसाठी ससाणे यांच्या माळावर दवाखाना चालू केला होता.

प्लेगच्या रोग्यांची सेवा करताना सावित्रीबाईंना प्लेगची लागण झाली. त्यातून १० मार्च 19897 रोजी त्यांचं निधन झालं.

VIEW ALL

Read Next Story