किरण डेंबलाच्या इन्स्टाग्रामवरदेखील अशा प्रेरणादायी महिलांच्या अनेक स्टोरीज दिसून येतील. त्यांचा प्रेरणादायी फिटनेस अनेक महिलेचा प्रेरणा देणारा ठरेल, याच शंका नाही.
किरण डेंबला या आता अनेक सेलिब्रिटींना टीप्स देणारी फिटनेस गुरु म्हणून ओळख मिळवली आहे.
किरण डेंबला यांनी योगासोबत जिमचे महत्त्व पटवून दिले. अधिक काळ जगण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी फिटनेस राखणे महत्त्वाचे आहे हेच तिने दाखवून दिले आहे.
महिलांनी वयाची 40 झाली तरी खचून न जाता नव्याने गोष्टी केल्या तर त्यात यश मिळते, हे किरण यांनी दाखवून दिले. ज्या वयात आता काहीच होणार नाही अशी मानसिकता घेऊन महिला जगतात त्या वयात (46) किरण यांनी जिमला जायला सुरुवात केली आणि आपली शरीरयष्टी पिळदार बनवली. हा त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला.
शरीर योग्य राखणे किती गरजेचे आहे आणि त्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी तसेच अन्य महिलांनाही याचा लाभ व्हावा यासाठी किरण यांनी जिम उभारली आणि ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली. त्यानंतर जिद्दीने त्यांनी फिटनेस ट्रेनिंग कोर्सदेखील पूर्ण केला.
मूळच्या उत्तर प्रदेश येथील आग्रा येथे राहणाऱ्या किरण डेंबला लग्न करुन हैदराबादला राहायला गेल्या आणि त्यानंतर दोन मुलांचा जन्म झाला. त्यानंतर त्यांनी फिटनेसवर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला. जिमला जात वजन कमी केले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही.
किरण डेंबला यांना त्यांच्या कुटुंबीयांनी चांगली साथ दिली. याच्या जोरावर त्यांनी दागिने विकून जिम बांधली आणि नव्याने सुरुवात केली. किरण यांनी दक्षिणात्य सिनेसृष्टीतील विशेषतः टॉलीवूडमधील जवळपास सर्व कलाकारांना तसेच समाजातील उच्चभ्रू व्यक्तीना व्यायामाचे आणि फिटनेसचे प्रशिक्षण दिले आहे.
दोन मुलांच्या जन्मानंतर किरण डेंबला हिने आपली पिळदार शरीरयष्टी अनेकांना दे धक्का दिला. फिटनेससाठी तिने खूप मेहनत घेतली. आता त्या पन्नाशीकडे झुकल्या आहेत. तरीही त्यांचा फिटनेस चांगला आहे. हैदराबाद स्थित एक तंदुरुस्ती तज्ज्ञ आणि प्रशिक्षक म्हणून त्या काम पाहत आहेत.