ई.आर.एस.एस (ERSS) आणि 112 अॅप : आपले अधुनिक सुरक्षादूत

Aug 26,2024

मदतीचा हात

तात्काळ प्रतिसाद सहाय्य योजना (ERSS) हा अॅप संकटाच्या वेळी आपल्याला सुरक्षित करण्याचे काम करतो.

संपर्क क्रमांक

112 हा आपत्कालीन संपर्क क्रमांक आहे .या लक्षात राहण्यासाठी सोप्या संपर्क क्रमांकाचा वापर करुन तुम्ही आपत्कालीन सुविधा पुरवणाऱ्या मोठ्या जालाशी जोडले जाल .

वेगवेगळे मार्ग

अॅपवर संवाद साधण्यासाठी एकाहून अधिक मार्ग उपलब्ध आहेत. तुम्ही संपर्क क्रमांकावर संपर्क करु शकता, लिखित संदेश पाठवू शकता, ई-पत्र पाठवू शकता, किंवा अॅपवरील पॅनिक बटण दाबून संकेत पाठवू शकता.

तुमचा शोध ERSSची जबाबदारी

अधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने 112 अॅप तुमचे अचूक सध्यस्थान शोधून काढते आणि तुमच्या जवळच्या आपत्कालीन सुविधा गटाला कळवते .

अनेक विरांची संघटना

ERSS च्या कार्यकारी संघटनेत शूर पोलिस, कसबी अग्निशामकदल आणि रुग्णसेवकांचा समावेश होतो.

केंद्रित कार्यप्रणाली

अॅपमधील सर्व आपत्कालीन सेवा एकाच केंद्रित कार्यप्रणाली मार्फत पुरवल्या जातात. कार्यप्रणालीला माहिती मिळाल्यानंतर प्रणाली मार्फत कार्यासाठी योग्य गटाला मदतीसाठी पाठवले जाते

सर्व नागरिकांसाठी सेवा

महिलांपासून लहान मूलांपर्यंत सर्वांना सेवेचा लाभ घेता येईल. समाज, लिंग, वयाच्या आधारे ERSS भेवभाव करत नाही.

पुर्णंपणे भारतीय सुविधा

ERSS अॅप C-DAD मार्फत बनवलेले संपूर्णपणे भारतीय सॉफ्टवेअर आहे.

VIEW ALL

Read Next Story