छोटा भीममध्ये दिसणारी टुन टुन मौसी काल्पनिक पात्र नाही!

Aug 26,2024


तुम्हाला माहीतं आहे का? की छोटा भीम या लहान मुलांच्या लाडक्या कार्टून मधील टुन-टुन मौसी हे पात्र काल्पनिक नसून एका स्त्रीच्या व्यक्तिमत्त्वावर आधारित आहे.

उमा देवी ऊर्फ टुन टुन मौसी

छोटा भीम या कार्टूनमधे सर्वांना लाडू खायला घालणारी टुन टुन मौसी ही खऱ्या आयूष्यात हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिली विनोदी महिला कलाकार होती. त्यांचे नाव उमा देवी होते.

परिवार

उमा देवींच्या पूर्ण परिवाराची जागेच्या वादविवादात हत्या करण्यात आली होती. त्या लहानपणीच अनाथ झाल्या.

बालपण

उमा देवींचे बालपण फार खडतर गेले. त्यांच्या नातेवाईंकांनी त्यांना नोकरासारखी वागणूक दिली.

प्रवास

उमा देवींना संगीताची फार आवड होती आणि त्यांना गायक बनायचं होतं म्हणून त्या घरुन पळून मुंबईला गेल्या. तिथे त्यांना नौशद अली भेटले.

कारकिर्दीला सुरुवात

1947 ला त्यांनी पहिले गाणे गायले,नंतर अजून 45 गाणी गायली.

विनोदाकडे वाटचाल

उमा देवींना नंतर गायक म्हणून यश मिळालं नाही. तेव्हा नौशद अलींनी उमा देवींना विनोदी कलाकार बनवायचे ठरवले आणि उमा देवींचं पडद्यावरचं नाव टुन टुन ठेवलं. त्यांच्या भूमिका फार लोकप्रिय झाल्या.

200 चित्रपट

उमा देवींनी जडत्त्व आणि गडद रंगाच्या महिलांना पडद्यावर उत्कृष्ट काम करता येतं नाही, त्यांना प्रसिध्दी मिळतं नाही ही संकल्पना मोडून काढली. उमाजींनी 1980 पर्यंत 200 चित्रपटांमध्ये काम केले.

मृत्यू

सुप्रसिध्द विनोदी महिला कलाकार असून देखील फार वाईट अवस्थेत त्यांचा मृत्यू झाला. शेवटच्या दिवसांमधे त्यांना जेवणसुध्दा प्राप्त झाले नाही.

VIEW ALL

Read Next Story