2023 मधील सर्वात कमकुवत पासवर्ड्सची यादी

Worst Password List 2023: वर्ष 2023 मध्ये डिसेंबरचा शेवटचा महिना सुरू असून या वर्षातील सर्वात वाईट पासवर्डची यादी जाहीर करण्यात आली आहे.

सोशल मीडिया अकाउंट्स आणि ऑनलाइन अकाउंट्ससाठी पासवर्ड आवश्यक असतो. वैयक्तिक आयुष्याशी याचा संबंध येतो. असे असतानाही कमकुवत पासवर्ड टाकण्याची चूक सर्वजण करतात.

पासवर्ड व्यवस्थापन प्रणाली कंपनी NordPass ने पासवर्डची एक यादी जारी केली. जे पासवर्ड खूप विक असून ते क्रॅक करणे खूपच सोपे असते.हे पासवर्ड एका सेकंदापेक्षा कमी वेळात हॅक केले गेले.

या यादीत 123456, Admin , 12345678, 123456789 हे पासवर्ड हॅक करण्यासाठी 1 सेकंदापेक्षाही कमी वेळ लागतो.

याशिवाय 1234567, 123123, 111111, 12345678910 आणि 000000 क्रॅक करण्यासाठी 1 सेकंदापेक्षा कमी वेळ लागतो.

याशिवाय UNKNOWN हॅक करण्यासाठी 17 मिनिटे लागतात असे म्हटले आहे.

123123, 111111 आणि Password हे खूप विक शब्द आहेत. यात 1234, 12345, पासवर्ड, 123, Aa123456, 1298076 यांचाही समावेश आहे.

admin123, ***** आणि वापरकर्ता पासवर्ड 11 सेकंदांपेक्षा कमी वेळात क्रॅक होऊ शकतात.

आजकाल, इंटरनेटच्या या युगात, प्रत्येकजण डिजिटल जगात वावरताना पासवर्ड मजबूत असणे गरजेचे असते.

स्ट्रॉंग पासवर्ड बनवण्यासाठी तुम्हाला अल्फा न्यूमरिकलचा वापर करायला हवा.

mAhar12login@#com असा स्ट्रॉंग पासवर्ड असू शकतो.

पासवर्ड कोणासोबत शेअर करु नका. तसेच दुसऱ्याच्या सिस्टिमवर पासवर्ड टाकताना काळजी घ्या.

VIEW ALL

Read Next Story