मोबाईल, लॅपटॉप किंवा डेस्कटॉप... या साऱ्या उपकरणांमध्ये की बोर्ड पाहिला असता त्यावरील की अर्थात बटणांचा क्रम QWERTY असा दिसते. प्रत्यक्षात मात्र ABCD अशा क्रमात हे शब्द पाहायला मिळतात.
की पॅडवर ही बटणं अशा क्रमात का असतात यामागंही एक महत्त्वाचं कारण आहे. 1868 मध्ये लॅथम शोल्स नावाच्या एका व्यक्तीनं टाईपराईटरचा शोध लावला होता.
या टाईपराईटरचा की पॅड ABC क्रमातच होता. त्याची बटणं अतिशय जवळ होती. ज्यामुळं टाईप करताना पिन एकमेकांमध्ये अडकत होत्या.
पुढे याच कारणानं टाईपराईटरच्या वापरात अडचणी येऊ लागल्या. ही समस्या दूर करण्यासाठी 1873 मध्ये शोल्सनं टाईपराईटरचा की पॅडच बदलला.
QWERTY फॉर्ममध्ये हा की पॅड तयार करण्यात आला. ज्यामुळं टायपिंगचा वेग कमी झाला असला तरीही टाईपराईटरचे पिन एकमेकांमध्ये अडकत नव्हते.
ज्या बटणांचा जास्त वापर केला जातो, ती बटणं या नव्या रचनेमध्ये सहजपणे दिसतीय अशा ठिकाणी ठेवण्यात आली. यामध्ये E I S M या बटणांचा समावेश आहे.
ज्या बटणांचा वापर कमी होतो उदाहरणार्थ X आणि Y ही बटणं काहीशी दूर ठेवण्यात आली.