व्हॉट्सॅअॅप यूजर्सना अनेक प्रकारचे फीचर्स पुरवते. यामध्ये लोकांना पासवर्ड प्रोटेक्टेड फोटो पाठवण्याची सुविधाही उपलब्ध आहे. ऐकून आनंद वाटला असला तरी थोडं थांबा. कारण हे अधिकृत फिचर नाही. यासाठी तुम्हाला एका ट्रिकची मदत घ्यावी लागेल.
या ट्रीकच्या मदतीने तुम्ही व्हॉट्सअॅपवर कोणालाही पासवर्ड प्रोटेक्टेड फोटो पाठवू शकता. फोटो उघडण्यासाठी, यूजरकडे पासवर्ड असणे आवश्यक आहे.
यासाठी सोपी आयडीया आहे. ही ट्रीक स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया. यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट किंवा पीडीएफ फॉरमॅटमध्ये फोटो पाठवावा लागेल.
सर्व प्रथम गुगल प्ले स्टोअर वरून IMG2PDF अॅप डाउनलोड करा. + बटणावर क्लिक करा आणि पासवर्ड सिक्योर करायची इमेज निवडा.
यानंतर पीडीएफ तयार करा बटणावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला पासवर्ड प्रोटेक्शन बॉक्सवर क्लिक करा. येथे तुम्हाला एंटर पीडीएफ फाईल नेमच्या पुढे फाइलचे नाव टाका.
यानंतर पीडीएफ पासवर्डच्या समोर पासवर्ड टाका. त्यानंतर OK बटणावर क्लिक करा. तुमची फाईल तयार होईल.
या फाईलच्या शेजारी असलेल्या शेअर बटणावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअॅप निवडा. आता व्हॉट्सअॅप ओपन होईल. तुम्हाला ज्याला फोटो पाठवायचा असेल त्याचा नंबर निवडा. त्यानंतर सेंड बटणावर क्लिक करा.
फोटो पाहण्यासाठी समोरच्या व्यक्तीला पासवर्ड माहित असणे आवश्यक आहे. वरील स्टेप फॉलो करताना टाकलेला पासवर्ड रिसीव्हरसोबत शेअर करा. ही इमेज फाइल कोणत्याही पीडीएफ रीडर अॅपने उघडता येते.