WhatsApp ने अखेर युजर्सना प्रतिक्षा असणारं 'ते' फिचर आणलं

व्हॉट्सअप नेहमीच नवे फिचर्स जोडत असतं. नुकतंच व्हॉट्सअपने असं एक फिचर आणलं आहे, जे तुमची प्रायव्हसी अजून मजबूत करतं.

View Once ऑडिओ

व्हॉट्सअपवर वॉइस मेसेजच्या फिचर्सला अपग्रेड केलं आहे. युजर्स आता View Once सेटिंगसह वॉइस मेसेज पाठवू शकतात.

कंपनीने 2021 मध्ये फोटो आणि व्हिडीओसाठी View Once फिचर आणलं होतं. आता वॉइस नोटसाठीही हे फिचर आणण्यात आलं आहे.

या फिचरमुळे एकदा पाठवलेला फोटो, व्हिडीओ एकदा पाहिल्यानंतर Disappear होतो. आता हे फिचर वॉइस नोटमध्ये मिळणार आहे.

हे फिचर वापरणं फारच सोपं आहे. WhatsApp ओपन केल्यानंतर कॉन्टॅक्टमध्ये जा.

सेटिंगमध्ये काय बदल करायचे?

येथे तुम्हाला ज्याला वॉइस नोट पाठवायची आहे त्याचं नाव सिलेक्ट करावं लागेल. तुम्हाला माईकच्या पर्यायावर होल्ड करुन वरच्या बाजूला स्लाइड करायचं आहे.

असं केल्याने तुमच्यासमोर ऑडिओ मेसेज इंटरफेस होईल. यानंतर तुम्हाला सर्क्युलर डॉटमध्ये पहिला पर्याय निवडायचा आहे.

यानंतर तुम्हाला मेसेज रेकॉर्ड करुन पाठवायचा आहे. अशाप्रकारे पाठवलेला मेसेज View Once सेटिंगसह जाईल.

WhatsApp ने हे फिचर ग्लोबली रोलआऊट केलं आहे. हे Android आणि iOS दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असेल. तुमच्याकडे फिचर नसेल तर WhatsApp अपडेट करा.

VIEW ALL

Read Next Story