अॅप डिलीट करून काहीही होत नाही कारण त्या अॅपने वापरताना घेतलेला डेटा त्याच्याकडे असतो.
डिलीट केलेले अॅप फक्त तुमच्या स्मार्टफोनमधून हटवण्यात येते. त्यातून डेटा जात नाही. त्यामुळे अॅप तुमच्या अकाऊंटमधून कायमचे हटवणे आवश्यक आहे.
अॅप डाऊनलोड केल्यानंतर, ते सर्व प्रकारच्या परवानग्या घेते जसे की लोकेशन, संपर्क, एसएमएस, फोटो गॅलरी, फोन लॉग, मायक्रोफोन आणि बरेच काही.
प्रत्येक अॅपला प्रत्येक परवानगीची आवश्यकता नसते. त्यामुळे ओके दाबताना काळजी घ्या. असे अॅक्सेस देऊन अनेक लोन अॅप्स लोकांना बळी बनवतात.
अॅप हटवताना तुम्ही ते लॉगआउट देखील करत नाही. अॅप डिलीट करता पण ते तुमची गोळा केलेली माहिती त्याच्या सर्व्हरवर सेव्ह करुन ठेवते.
या डेटाचे काय होणार हे पूर्णपणे अॅपच्या निर्णयावर अवलंबून आहे. म्हणूनच ही समस्या मुळापासून नष्ट करण्यासाठी योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. (सर्व फोटो - freepik.com)
अॅप डिटील केल्यावर सेटिंगमध्ये जा. त्यानंतर Settings for google apps वर जा. तिथे Connected Apps वर क्लिक करा.
Connected Apps मध्ये तुम्हाला डिलीट केलेले अॅप दिसतील. तिथे ज्या अॅपने तुमची परवानगी घेतली होती ते लगेच डिलीट करा.