फेस वॅक्सिंग करताय, तर थांबा! तुमच्या सौंदर्यात येऊ शकते बाधा

शरीरावरील हाता-पायावर असलेले केस काढण्यासाठी महिला वॅक्सिंग करतात. हाता-पायाबरोबरच चेहऱ्यावरील लव म्हणजेच छोटे छोटे केस काढण्यासाठीही फेस वॅक्सिंग केली जाते. गेल्या काही वर्षांपासून हा ट्रेंड वाढला आहे.

फेस वॅक्सिंग

ज्या महिलांच्या चेहऱ्यावरील केस उठून दिसत आहेत ते चेहऱ्यावर ब्लीच-थ्रेडिंग किंवा वॅक्सिंग करतात. फेस वॅक्सिंग केल्याने चेहऱ्यावर येणाऱ्या केसांची वाढ हळूहळू येते. त्यामुळं सतत केस काढावे लागत नाहीत

स्कीन सॉफ्ट होते

वॅक्सिंग केल्याने स्कीन सॉफ्ट होते आणि नको असलेल्या केसांपासूनही सुटका होते. मात्र, वॅक्सिंगची ही पद्धत तुमच्या सौंदर्यात बाधा आणू शकते.

स्कीन सेन्सिटिव्ह

फॅशिअल वॅक्सिंग केल्यामुळं चेहऱ्यावर जळजळ जाणवू शकते. कारण वॅक्स केल्यानंतर स्कीन सेन्सिटिव्ह होते. म्हणूनच वॅक्सिंग केल्यानंतर चेहऱ्यावर हार्ड टोनर लावू नये, असा सल्ला देतात.

पुरळ

फेशियल वॅक्सिंग केल्यानंतर महिलांच्या चेहऱ्यावर काही वेळासाठी पुरळदेखील उठते. हे पुरळ त्वचेच्या वरील भागात काही वेळासाठीच असते. ज्या भागातील केस मुळांपासून खेचून काढले आहेत. तिथेच असे पुरळ येतात.

सौंदर्य खराब होऊ शकते

सतत वॅक्सिंग केल्याने चेहऱ्याचा रंग काळा पडू शकतो. इतकंच नव्हे तर फॅशिअल वॅक्सिंगमुळं तुमचं सौंदर्य खराब होऊ शकते. चेहऱ्यावर अतिगरम वॅक्स लावलं तरी परिस्थिती निर्माण होऊ शकते.

सुरकुत्या येण्याची

वॅक्सिंग करताना त्वचा खेचली जाते. अशावेळी स्कीन लूज पडू शकते. तर, सुरकुत्या येण्याचीही शक्यता असते.

सेन्सिटिव्ह त्वचा

जर तुमची त्वचा कोरडी- सेन्सिटिव्ह किंवा उन्हामुळं रापली असेल तर तुम्ही वॅक्सिंग ट्रिटमेंट करणे टाळा

VIEW ALL

Read Next Story