आयसीसी मेन्स टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये रविवारी म्हणजे 9 जूनला भारत आणि पाकिस्तानदरम्यान हायव्होल्टेज सामना रंगणार आहे.
भारत आणि पाकिस्तानदरम्यानचा हा सामना न्यूयॉर्कच्या नासाऊ काऊंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडिअमवर खेळला जाणार आहे.
तिथल्या हवामान विभागाच्या अंदाजानुसार 9 जूनला न्यूयॉर्कमध्ये पासऊ पडण्याची 42 टक्के इतकी शक्यता आहे. तर तापमान 25 डिग्री सेल्सिअमपर्यंत राहण्याचा अंदाज आहे.
पावसामुळे भारत-पाकिस्तान सामन्यात टॉस उशीराने होण्याची शक्यता आहे. पण पावसामुळे सामना रद्द होण्याची शक्यता कमी आहे.
पण पावसामुळे भारत-पाकिस्तान सामना रद्द करण्यात आलातर दोन्ही संघांना एक-एक गुण दिला जाईल. ग्रुप सामन्यांसाठी राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही.
प्रत्येकी एक गुण मिळाल्यास भारताच्या खात्यात दोन सामन्यात तीन गुण जमा होतील. तर पाकिस्तानच्या खात्यात दोन सामन्यात 1 गुण जमा होईल
अशात पाकिस्तानला सुपर 8 फेरी गाठण्याचा मार्ग कठिण होईल. पाकिस्तानला कॅनडा आणि आयर्लंडविरुद्धचा सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागेल.