यासोबतच, लवकरच व्हॉट्सअॅपवर कॅलिस्टोगा, कुरियर प्राइम, डॅमियन, एक्सो 2 आणि मॉर्निंग ब्रीझ सारखे नवीन फॉन्ट्स पाहायला मिळतील.
WhatsApp एका नवीन टेक्स्ट एडिटर वैशिष्ट्यावर काम करत आहे. जे ड्रॉईंग टूलमध्ये नवीन फॉन्ट आणि टेक्स्ट फॉरमॅटिंग आणेल. याशिवाय यूजर्स टेक्स्ट बॅकग्राउंडचा रंग बदलू शकतील.
WhatsApp iOS वर जागतिक स्तरावर 'व्हॉईस स्टेटस अपडेट' वैशिष्ट्य देखील आणत आहे, ज्याद्वारे वापरकर्ते व्हॉइस नोट्स रेकॉर्ड करू शकतात आणि स्टेटसद्वारे शेअर करू शकतात. सध्या व्हॉइस नोटसाठी कमाल रेकॉर्डिंग वेळ 30 सेकंद आहे.
जेव्हा वापरकर्ता मजकूर असलेली Image उघडतो. तेव्हा आता त्याला एक नवीन बटण दिसेल. जे त्याला Image मधील मजकूर कॉपी करू देईल. हे नवीन फीचर व्यू वन्समध्ये काम करणार नाही. मेसेजिंग प्लॅटफॉर्म iOS वर स्टिकर मेकर टूल आणत आहे. जे वापरकर्त्यांना Image स्टिकर्समध्ये रूपांतरित करू देईल.
मेटा-मालकीच्या मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp ने iOS वर 'टेक्स्ट डिटेक्शन' फीचर येणार आहे. या फीचरच्या मदतीने यूजर्स थेट इमेजमधून टेक्स्ट वेगळे करू शकतील. अपडेटसाठी नवीन WhatsApp इन्स्टॉल केल्यानंतर कंपनी हे फीचर प्रत्येकासाठी आणत आहे.