2024 इंडियन ऑटो सेक्टरसाठी खूप फायदेशीर ठरले आहे. यावर्षी एकापेक्षा एक इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च झासल्या आहेत.
जर तुम्ही देखील इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला बेस्ट स्कूटरची यादी देणार आहोत.
ज्यामध्ये सर्वात प्रथम येते बजाजची चेतक 35. या स्कूटरची किंमत 1. 20 लाख रुपयांपासून सुरु होते. फूल चार्जमध्ये ही 153 किमी जाते.
होंडाने त्यांची बहुप्रतिक्षित Activa Electric स्कूटर लॉन्च केलीय. एका चार्जमध्ये ही 102 किमी जाते.
TVS iQube कंपनीने सर्वात मोठी बॅटरी असणारी स्कूटर लॉन्च केलीय. ही एका चार्जमध्ये 150 किमी जाते. जिची किंमत 94,999 रुपये आहे.
लेक्ट्रिक्स ईवीने त्यांची इलेक्ट्रिक स्कूटर Nduro लॉन्च केली आहे. ही एका चार्जमध्ये 117 किमी जाते. हिची किंमत 59,999 रुपये आहे.