सरकारच्या मेक इन इंडिया अंतर्गत बनवलेल्या वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. भारतातील अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) धावत आले

Jul 27,2023


वंदे भारत ही हायस्पीड ट्रेन आहे. या गाड्या संपूर्णपणे एसी आणि वायफाय सुविधेने सज्ज आहेत. याशिवाय आधुनिक सस्पेन्शन तंत्रज्ञाना यामध्ये असून पुश बॅक सीट आहेत.


पण वंदे भारत एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आपातकालीन परिस्थितीत ट्रेन कशी थांबवावी याची कदाचित माहिती असेल.


वंदे भारत एक्स्प्रेस अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनवण्यात आली आली आहे. यात चेन पुलिंग सिस्टिम नाही. पण इमरजन्सीमध्ये ट्रेन थांबवण्याची पूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे.


वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये अलार्म सिस्टीम बसवण्यात आली आहे. आपातकालीन परिस्थितीत अलार्म दाबून ट्रेन थांबवू शकता


एखाद्या प्रवाशाने अलार्म वाजवल्यास त्या प्रवाशाचा चेहरा ट्रेनच्या लोको पायलटा दिसेल. त्यानतंर ऑडिओच्या माध्यमातून तो प्रवासी आणि लोको पायलट एकमेकांशी जोडले जातील.


लोको पायलट प्रवाशाला अलार्म दाबण्याचं कारण विचारेल. योग्य आणि महत्त्वाचं कारण असल्यास प्रवाशाची तात्काळ मदत केली जाईल.


पण प्रवाशाने विनाकारण अलार्म दाबला असेल तर त्या प्रवाशावर कारवाई करण्यात येईल. वंदे भारत एक्स्प्रेसच्या प्रत्येक बोगीत टॉक बटनही लावण्यात आलं आहे.


टॉक बटन हे एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस आहे. या माध्यमातून थेट प्रवाशाला थेट लोको पायलटशी संपर्क साधता येईल. आपात परिस्थितीत प्रवाशी लोकोपायलटकडे मदत मागू शकतो

VIEW ALL

Read Next Story