व्हॉट्सअ‍ॅप न उघडता वाचता येतील मेसेज

नोटिफकेशनमध्ये अर्धवट वाचता येतात मेसेज

जरी तुम्ही तुमचे WhatsApp मेसेज नेहमी नोटिफकेशनमध्ये वाचू शकता, तरीही हे अ‍ॅप मोठे मेसेज पूर्ण दाखवत नाही.

चॅट न करता वाचायचे असतात मेसेज

अनेक वेळा अशीही परिस्थिती उद्भवते जेव्हा तुम्हाला चॅट ओपन करायचे नसते पण त्याचा मेसेज नक्कीच वाचायचा असतो.

अॅप न उघडता मेसेज वाचणे कसे शक्य आहे?

अॅप न उघडता WhatsApp मेसेज वाचण्याची अनेक कारणे असू शकतात. पण व्हॉट्सअॅपच्या या गुप्त ट्रिकबद्दल आम्ही तुम्हाला सविस्तरपणे सांगत आहोत.

अॅप न उघडता पूर्ण मेसेज कसा वाचायचा?

ही ट्रिक अगदी सोपी आहे आणि सेट करण्यासाठी फक्त एक मिनिट लागतो. विजेट्स कसे वापरायचे हे ज्यांना माहित आहे ते ते सहजपणे वापरण्यास सक्षम असतील.

स्टेप 1

Android फोन युजर्सनी प्रथम मुख्य स्क्रीनच्या मेन स्क्रिनवर लॉंग प्रेस करुन ठेवावे

स्टेप 2

आता, विजेट्सवर टॅप करा आणि तुम्हाला स्मार्टफोन स्क्रीनवर सर्व विजेट्स दिसतील. आता येथे WhatsApp विजेट शोधा.

स्टेप 3

त्यानंतर फक्त WhatsApp विजेटवर टॅप करा आणि ते तुमच्या होम स्क्रिनवर येईल. त्यानंतर तुम्ही विजेटवर लॉंग प्रेस करा आणि जोपर्यंत तुम्हाला क्लिअर होमपेज स्क्रीन इंटरफेस मिळत नाही तोपर्यंत उजवीकडे ड्रॅग करा

स्टेप 4

त्यानंतर डन बटणावर टॅप करा. विजेटवर लॉंग प्रेस करा आणि त्यास टॉपवर हलवा. मग तुम्हाला विजेटचा एक्स्टेंड करण्याचा पर्याय मिळेल. तुम्ही ते फुल स्क्रीनवर वाढवू शकता. यामुळे संपूर्ण मेसेज वाचणे सोपे होईल.

आता अॅप न उघडता वाचा whatsapp मेसेज

एका होमपेजवर WhatsApp विजेट सेट केल्यानंतर, तुम्हाला सर्व मेसेज वाचण्यासाठी खाली स्क्रोल करावे लागेल. अॅपमधील चॅटनुसार मेसेज अलाईन केला जातो. नवीन मेसेज टॉपवर असेल. (सर्व फोटो - freepik.com)

VIEW ALL

Read Next Story