टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला सध्या विश्रांती देण्यात आली आहे. विंडीज दौऱ्यासाठी त्याला टीम इंडियातून बाहेर बसवण्यात आलं आहे.
आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स संघाकडून खेळताना मोहम्मद शमीने दमदार कामगिरी केली होती. 28 विकेट घेत शमी पर्पव कॅपचा मानकरी ठरला होता.
शमी आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चांगलाच चर्चेत असतो. शमीची पत्नी हसीन जहांने 2018 मध्ये शमीविरोधात एफआयआर दाखल केला होता.
2019 मध्ये शमीविरोधात कोर्टाने अटक वॉरंट जारी केलं होतं. याविरोधात शमीने याचिका केली होती.
यानंतर कोर्टाने शमीला दिलासा दिला. पण हसीन जहांने कोलकाता हायकोर्टात याचिका केली
कोलकाता हायकोर्टात शमीच्या बाजूने निकाल दिला. त्यानंतर हसीन जहांने सुप्रीम कोर्टात दाद मागितली.
आता सुप्रीम कोर्टात तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने हसीन जहां प्रकरणतात एका महिन्यात निर्णय देण्याचे आदेश दिले आहेत.
त्यामुळे अलीपूर सेशन कोर्टाला एका महिन्याच्या आत या प्रकरणावर निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यामुळे शमीला दिलासा मिळणार की अडचणी वाढणार हे येत्या महिन्यात ठरणार आहे.
मोहम्मद शमी आणि आयपीएल चीअर लीडर असणाऱ्या हसीन जहांची ओळख 2011 मध्ये झाली. त्यानंतर 2014 मध्ये दोघांनी लग्न केलं.
शमी आणि हसीन यांना एक मुलगी आहे. पण 2018 मध्ये दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.