स्मार्टफोनमध्ये दडलेलं असतं शुद्ध सोने

Jul 09,2023

हातातलं सोनं देतो फेकून

सोनं कोणाला आवडत नाही, लोकांना जमेल तितकं सोनं ठेवायचं असतं, पण कळत-नकळत कधी कधी आपण सोनंही फेकून देतो.

घराच्या कोपऱ्यात ठेवून देतो सोनं

जुन्या मोबाईलमध्ये सोने लपलेलं असतं आणि ते आपण घराच्या कुठल्यातरी एका कोपऱ्यात फेकून देतो.

काही भागांमध्येच होतो सोन्याचा वापर

सोन्याचा वापर स्मार्टफोनच्या काही भागांमध्येच केला जातो कारण तो महाग असते आणि त्याचा वापर केल्यास स्मार्टफोनची किंमत आणखी वाढेल.

लोकांनी सुरु केले व्यवसाय

ज्यांना हे माहित आहे त्यांनी आता एक नवीन व्यवसाय सुरू केला आहे ज्यामध्ये जुने स्मार्टफोन घेऊन त्यांच्या आत असलेले सोने बाहेर काढले जाते.

सोन्याचा वापर कशासाठी केला जातो

सोन्याची वाहकता सर्वात जास्त आहे. त्याच वेळी, सोन्यामध्ये इतर अनेक गुणधर्म आहेत, ज्यामुळे ते मोबाईल प्रोसेसर आणि अनेक चिप्समध्ये वापरले जाते.

आणखी कोणते धातू वापरले जातात?

सोन्याव्यतिरिक्त, चांदी, तांबे यांसारखे इतर अनेक धातू आहेत जे फोन बनवताना वापरले जातात.

मोबाईल मध्ये किती सोने असते?

प्रत्येक मोबाईलमध्ये सामान्यतः सुमारे 0.034 ग्रॅम सोने वापरले जाते. तर 0.00034 ग्रॅम प्लॅटिनम, 0.35 चांदी आणि 16 ग्रॅम तांबे यांचाही वापर केला जातो.

आणखी कुठे असते सोने?

मोबाइलमध्ये वापरल्या जाणाऱ्या सिम कार्डमध्येही सोने असते. सिममधील सोने काढण्यासाठी भरपूर सिम कार्ड आवश्यक असतात.

सोने कसे काढतात?

इलेक्ट्रॉनिक स्क्रॅपमधून सोने काढण्याच्या दोन मानक पद्धती आहेत, पहिली, सोने जाळण्यासाठी उच्च तापमानात वितळवणे आणि दुसरे, सायनाइड द्रावण सारख्या लीचिंग रसायनांचा वापर करणे, जे महाग आणि विषारी आहे. (सर्व फोटो - freepik.com)

VIEW ALL

Read Next Story