वेट लॉस सप्लिमेंट

वजन कमी करण्यासाठी आपण अनेकदा कृत्रिम गोष्टींचा वापर करतो. पण घरात उपलब्ध असणाऱ्या अनेक गोष्टीही वजन कमी करण्यात मदत करतात.

आलं खाल्ल्याने फायदा

किचनमध्ये नियमित वापरलं जाणारं आलंही वजन कमी करण्यात मदत करतं.

आलं फक्त चहात नाही तर आहारातही समाविष्ट करा

आल्याचा वापर मसाले, औषधं तसंच घरगुती उपचारात केला जातो. पण तुम्ही नैसर्गिकरित्या वजन कमी करण्यातही याचा वापर करु शकता.

आल्याचं पाणी

काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, एक ग्लास पाण्यात आल्याच्या रसाचे काही थेंब मिसळून सकाळी किंवा दिवसभर प्यायल्यास चरबी कमी होते.

आल्याची पावडर

सुक्या आल्याच्या पावडरमध्ये सूज कमी करण्याचे गुणधर्म असतात. तुम्ही पाण्यातून आल्याच्या पावडरचं सेवन करु शकता. किंवा ते अन्नात मिसळूनही खाऊ शकता.

आल्याचा चहा

अनेक घरांमध्ये नियमितपणे आल्याचा चहा प्यायला जातो. तुम्ही हवं असल्यास आल्याला चहात टाकून सेवन करु शकता.

आलं आणि लिंबू पाणी

अनेक तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, आलं आणि लिंबूचं मिश्रण शरिरातील अतिरिक्त वजन कमी करतं.

डिटॉक्स ड्रिंक

1 चमचा खिसलेलं आलं एक ग्लास गरम पाण्यात टाका. त्याला लिंबूचा रस मिसळा आणि दिवसभर थोडं थोडं सेवन करा. गोडवा हवा असल्यास त्यात तुम्ही मधाचे काही थेंब टाकू शकता.

अतिरिक्त सेवन टाळा

पण आल्याचं सेवन करताना तुम्ही तज्ज्ञांचं मार्गदर्शन नक्की घ्या. कारण अतिरिक्त सेवन केल्यास पोटात जळजळ होऊ शकते.

VIEW ALL

Read Next Story