सरकारने मोठी कारवाई करत 70 लाख मोबाईल क्रमांक बंद केले आहेत. म्हणजेच या मोबाईल क्रमांकांचा वापर पूर्णपणे बंद झाला आहे.
वाढत्या डिजिटल फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने हे पाऊल उचलले आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे सरकारने 70 लाख मोबाईल क्रमांक बंद कायमचे बंद केले आहेत.
आर्थिक सायबर सुरक्षेमध्ये डिजिटल पेमेंट ट्रान्सफर वाढवण्यासंबंधीच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीनंतर आर्थिक सेवा सचिव विवेक जोशी यांनी मंगळवारी सांगितले की, ऑनलाइन फसवणूक रोखण्यासाठी सरकारने 70 लाख क्रमांक कायमचे बंद केले आहेत.
या संदर्भात बँकांना सायबर फसवणुकीपासून ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी मजबूत यंत्रणा तयार करण्यास सांगितले आहे. भविष्यातही अशा बैठका घेण्यात येणार असून पुढील बैठक जानेवारीत होणार असल्याचे सांगण्यात आले.
डिजिटल फसवणुकीबाबत जागरूकता खूप महत्त्वाची आहे. अशा फसवणुकीला आळा घालण्यासाठी समाजाचे या सगळ्या प्रकाराबाबत प्रबोधन करणे गरजेचं आहे. (सर्व फोटो - freepik.com)